Karnataka, जानेवारी 28 -- कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यातील एका रुग्णालयात काम करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील (४५) यांचे शनिवारी सकाळी अपहरण करण्यात आले. त्याचे अपहरण करणाऱ्यांनी त्यांच्या भावाकडे सहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, काही तासांनंतर डॉक्टरांना घरी जाण्यासाठी ३०० रुपये देऊन सोडून देण्यात आले.

सूर्यनारायणपेट येथील शनेश्वर मंदिराजवळ डॉ. सुनील मॉर्निंग वॉकला गेले असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा इंडिगो कारमधून एक टोळी आली आणि त्यांना जबरदस्तीने सुनील यांना गाडीत बसवले आणि पसार झाले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

समान नागरी कायद्याची उत्तराखंडमधून सुरुवात, जाणून घ्या त्याबद्दल महत्वाच्या गोष्टी आणि विरोध करण्याची कारणे

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत...