Mumbai, जानेवारी 29 -- Defence Stock News : स्मॉल कॅप डिफेन्स स्टॉक अपोलो मायक्रो सिस्टीम्सने बुधवारी, २९ जानेवारी रोजी बीएसईवर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जवळपास ६ टक्क्यांची उसळी घेतली. कंपनीचे समभाग इंट्राडे उच्चांकी पातळीवर १२५.८० रुपयांवर पोहोचले. शेअर्सच्या या वाढीमागे मोठी घोषणा आहे. वास्तविक, कंपनीला डीआरडीओकडून ऑर्डर मिळाली आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम्सने २८ जानेवारी रोजी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) त्यांना ७.३७ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनी डिसेंबर तिमाहीचे निकाल ४ फेब्रुवारीरोजी जाहीर करेल.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) ७.३७ कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी कंपनीला सर्वात कमी बोली लावणारी (एल १) कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे, हे सांगताना आम्हाला आन...