भारत, मार्च 20 -- एअरोस्पेस आणि डिफेन्स इंडस्ट्रीशी संबंधित पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या शेअर्समध्ये वादळ उठले आहे. पारस डिफेन्सचा शेअर गुरुवारी बीएसईवर १० टक्क्यांनी वधारून १,०४६.९५ रुपयांवर पोहोचला. डीआरडीओकडून ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली. या ऑर्डरची किंमत १४२.३१ कोटी रुपये आहे. पारस डिफेन्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1592.75 रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 608.75 रुपये आहे. पारस डिफेन्सच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

पारस डिफेन्सअँड स्पेस टेक्नॉलॉजीजला डीआरडीओकडून लेझर सोर्स मॉड्यूल विकसित करण्यासाठी आणि मोबाइल प्लॅटफॉर्मवर बीम कंट्रोल सिस्टम (बीसीएस) सोबत त्याचे एकत्रीकरण करण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे. अँटी-ड्रोन आणि अँटी-म...