भारत, नोव्हेंबर 24 -- बिहारमध्ये नेहमीच शिक्षणावरून प्रश्न उपस्थित केला जातो. अनेकदा तिथल्या शिक्षण व्यवस्थेतला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात शिक्षिका मुलांना हसत खेळत शिकवत आहे. वर्गात मुलांना कंटाळा येऊ नये यासाठी शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. असंच बांकामधील एका शिक्षेकेनं केलं आहे.

बांका जिल्ह्यातील कटोरियातल्या पोन्नत मध्य विद्यालयातला हा व्हिडीओ आहे. या शाळेतील शिक्षिका खुशबू कुमारी मुलांना अनोख्या पद्धतीने शिकवतात. त्या विद्यार्थ्यांसोबत मिळून गाण्यांवर डान्स करत असलेला व्हिडीओ व्हायरल होतोय. सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्या या शिकवण्याच्या पद्धतीचे कौतुक केले आहे.

कटोरियातल्या राणा नगरच्या असलेल्या शिक्षिका खुशबू कुमामरी यांचे पतीस...