Amritsar, फेब्रुवारी 5 -- IllegalIndianImmigrants : अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन विमान अमृतसर विमानतळावर पोहोचले. या विमानात १०४ भारतीय प्रवासी आहेत, ज्यांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. या लोकांना अमेरिकन लष्कराच्या सी-१७ हरक्युलिस विमानातून आणण्यात आले आहे. अमेरिकेने भारताव्यतिरिक्त ब्राझील, मेक्सिकोसह इतर अनेक देशांतून बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार केले आहे. इतकंच नाही तर ज्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी झालेली नाही, त्यांना ग्वांतानामो बेसह अनेक तुरुंगात ठेवण्यात येत आहे.

भारतात आणलेल्या १०४ स्थलांतरितांमध्ये १३ मुले, ७९ पुरुष आणि २५ महिला आहेत. यातील ३३ जण गुजरातमधील असून त्यांना विमानतळावरूनच गुजरातला पाठवण्यात येणार आहे. पंजाब पोलिस आणि सीआयएसएफचे जवान विमानतळाच्या आत आणि बाहेर तैनात करण...