भारत, एप्रिल 10 -- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील शुल्क (आयात शुल्क) वाढवण्याच्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठी गुंतवणूक केली आणि पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. स्पॉट गोल्ड चा भाव गुरुवारी 0.2 टक्क्यांनी वाढून 3,089.17 डॉलर प्रति औंस झाला. त्याचवेळी अमेरिकेतील सोन्याचा वायदा ०.८ टक्क्यांनी वधारून ३,१०४.९० डॉलरवर पोहोचला. यापूर्वी स्पॉट गोल्ड२.६ टक्के आणि फ्युचर्स ३ टक्क्यांनी वधारले होते. तर, 3 एप्रिल रोजी सोने 3,167.57 डॉलरच्या विक्रमी पातळीवर होते.

महावीर जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार आणि कमॉडिटी बाजार १० एप्रिल रोजी बंद राहणार आहेत. मात्र, मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सायंकाळी पाच वाजता कमॉडिटी ट्रेडिंग सुरू होईल.

या वर्षी आतापर्यंत सोने 14421 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारल...