भारत, जुलै 9 -- हल्लीच्या काळात स्मार्टफोन्स आणि टॅब्लेट्सपासून ते लॅपटॉप्स व गेमिंग सिस्टीम्सपर्यंतच्या विविध स्क्रीन्सनी आपल्या आयुष्याचा एक मोठा हिस्सा व्यापून टाकला आहे. शिक्षणाच्या आणि मनोरंजनाच्या दृष्टीने स्क्रीन टाइम अत्यावश्यक असला, तरीही त्याचा अतिरेक केल्याने, विशेषत: विशिष्ट स्थितीत बसून त्याचा अती वापर केल्याने लहान व किशोरवयीन मुलांमध्ये एक धोकादायक स्थिती निर्माण होत आहे, जिला टेक्स्ट नेक सिंड्रोम असे म्हटले जाते. मुंबई येथील नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट, पीडिअॅट्रिक स्पाइन सर्जन डॉ. सिद्धार्थ शाह यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.

टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे काय?

टेक्स्ट नेक सिंड्रोम हा मोबाइल फोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स आणि गेम कॉन्सोल्स सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा सारखा वापर करण्याची सवय लाग...