Mumbai, फेब्रुवारी 23 -- Tata Safari Harrier STEALTH Edition Price Features : आपल्या प्रतिष्ठित SUV सफारीला २७ वर्षे पूर्ण झाल्याने टाटा मोटर्सने सफारीसोबतच हॅरियरची स्टेल्थ एडिशन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. ही एडीशन मर्यादित असणार असून केवळ २७०० युनिट्समध्ये उपलब्ध असेल. यात खास मॅट ब्लॅक फिनिश, नवीन वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञान आहे.

Tata Harrier Stealth Edition ची एक्स-शोरूम किंमत २५.०९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि Safari Stealth Edition ची एक्स-शोरूम किंमत २५.७४ लाख रुपयांपासून सुरू होते. ही एडिशन खासकरून ज्यांना स्टाइल आणि एक्सक्लुझिव्ह एसयूव्ही हवी आहे, त्यांच्यासाठी आहे.

टाटा सफारी आणि हॅरियर स्टेल्थ एडिशनचे सर्वात आकर्षक पैलू म्हणजे त्यांचे मॅट ब्लॅक फिनिश. यामुळे कारला एक युनिक आणि पॉवरफुल लुक मिळतो. याव्यतिरिक्त, R19 ...