भारत, ऑगस्ट 4 -- झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. लोकप्रिय आदिवासी नेत्याने २०१९ मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती. त्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली मालमत्ता आणि देणी जाहीर केले होते. त्यांनी आपल्या मागे किती मालमत्ता सोडली आहे आणि त्याच्यावर किती देणी आहेत हे जाणून घेऊया.

मायनेताडॉटकॉम वर दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये शिबू सोरेन यांच्याकडे एकूण ७.२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आणि सुमारे १.५ कोटी रुपयांची देणी होती. प्रतिज्ञापत्रानुसार, शिबू सोरेन यांनी २०१७-१८ या वर्षाच्या प्राप्तिकर विवरणपत्रात एकूण ७,०५,०९० रुपयांचे उत्पन्न दाखवले होते.

२०१९ मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शिबू सोरेन यांच्याकडे ७०,१९० रुपये आणि त्यांच्या पत्नीकडे २४,५३,००० रुपयांची रोकड होती. ...