भारत, मे 17 -- अभिनेत्री केतकी चितळे (ketki chitle) हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. केतकीला १५ मे रोजी अटक करण्यात आली. कळंबोली पोलीस ठाण्यात तिची बराच वेळ चौकशी केल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदेश बांदेकर यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी केतकी चितळे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. "संस्कार आणि संस्कृती विसरून विधाने करणाऱ्यांबद्दल मला काहीच बोलायचे नाही. ज्येष्ठांचा आदर राखणे फार गरजेचे आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे याविषयी मी काहीही बोलू इच्छित नाही," असे आद...