Delhi, फेब्रुवारी 18 -- Gyanesh Kumar appointed CEC : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा केंद्रीय निवडणूक आयोगातील कार्यकाळाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मावळते मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या जागी ज्ञानेश कुमार काम पाहतील. १९८८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार गेल्या वर्षी मार्चपासून निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते.

ज्ञानेश कुमार हे नव्या कायद्यानुसार नियुक्त होणारे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नव्या कायद्यात निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या नियुक्तीप्रक्रियेत सरन्यायाधीशांऐवजी गृहमंत्र्यांचा निवड समितीत समावेश करण्यात आला आहे.

निवड समितीने त्यांचे नाव निश...