Kerala, फेब्रुवारी 12 -- केरळमधील कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिगची अंगावर काटा आणणारी घटना घडली. या प्रकरणी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. कॉलेजमधील तीन ज्युनिअर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. कनिष्ठ विद्यार्थ्यांना आधी नग्न करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांचे फोटो काढण्यात आले.

गेल्या तीन महिन्यांपासून या तीनविद्यार्थ्याची रॅगिंग सुरूअसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या विद्यार्थ्यांनी रँगिग करत ज्युनिअर विद्यार्थ्यांना नग्न करत त्यांच्याप्रायव्हेट पार्टला डम्बल लटकवले. या घटनेमुळे खळबळ उडाली.

तक्रारीनुसार, वेटलिफ्टिंगच्या डम्बलने त्यांना मारहाण करण्यात आली. सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर विद्यार्थ...