Delhi, नोव्हेंबर 13 -- jio plan : रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी विविध ऑफर आणल्या आहेत. जीओचे भारतात सर्वाधिक सब्सक्राइबर असून त्यांच्यासाठी जीओने अनेक प्रीपेड प्लान बाजारात आणले आहेत. यातील काही प्लॅनमध्ये ओटीटी सर्व्हिसेसचे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन ग्राहकांना दिले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत कंपनी १० ओटीटी सेवांचा कंटेंट पाहण्याचा पर्याय ग्राहकांना देत आहे. हा ओटीटी प्लॅन इतर प्लॅन्सपेक्षा चांगला का आहे याची माहिती घेऊयात.

जर तुम्हाला सोनीलिव्ह किंवा झी ५सारख्या लोकप्रिय ओटीटीवर कंटेंट पाहायचा असेल तर तुम्हाला सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅन संपण्याची वाट पाहावी लागणार नाही. जिओच्या स्वस्त ओटीटी प्लॅनला कंपनीने जिओ टीव्ही प्रीमियम लाइनअपचा भाग बनवले आहे. या प्लॅनमध्ये एक्स्ट्रा डेटा बेनिफिट देखील ग्राहकांना मिळण...