Mumbai, जानेवारी 30 -- Raj Thackeray on Election : राज्यातील विधानसभा निवडणुकांवर अनेकांनी शंका व्यक्त केली होती. काही उमेदवारांनी तर थेट पैसे भरून पुन्हा मतमोजणी करून घेतली होती. त्यानंतर आता आज राज ठाकरे यांनी देखील राज्याच्या निवडणूक निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी ईव्हीएमवर देखील शंका व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा एक खासदार निवडून आला असताना त्यांना विधानसभा निवडणुकीत ४३ जागा कशा मिळाल्या ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत निवडणूक आयोगावर व विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी निवडणूक निकालाची चिरफाड केली.

राज ठाकरे म्हणाले, 'मी बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटतोय. विधानसभा न...