New Delhi, एप्रिल 18 -- ED on Arvind Kejriwal : रक्तातील साखरेची पातळी वाढून तब्येत बिघडावी आणि जामीन मिळावा म्हणून अरविंद केजरीवाल हे तुरुंगात जाणूनबुजून चहासोबत आंबा, मिठाई आणि साखरेचे पदार्थ खात असल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयानं (ED) केला आहे.

केजरीवाल यांच्या साखरेच्या पातळीवर सातत्यानं लक्ष ठेवण्यासाठी आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी देण्यासाठी केजरीवाल यांनी दिल्ली न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली. केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होत असून त्यांना नियमित डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असल्याचं अर्जात नमूद करण्यात आलं आहे. आठवड्यातून किमान तीन वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांचा सल्ला मिळावा, असं केजरीवाल यांनी अर्जात म्हटलं आहे.

ईडीच्या वतीनं विशेष वकील जोहेब हुसेन यांनी युक्ति...