Mumbai, फेब्रुवारी 14 -- Devabhau Kesari 2025 : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे यंदाही कुस्तीचा थरार रंगणार आहे. जामनेर येथे १६ फेब्रुवारीला 'नमो कुस्ती महाकुंभ'सोबत 'देवाभाऊ केसरी' ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

'शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम' हा संदेश देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या दंगलीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या कुस्ती स्पर्धेत भारतासह, फ्रान्स, उझबेकिस्तान, रोमानिया आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, ऑलिम्पियन, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरीसारखे महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

जामनेरची कुस्ती स्पर्धा १६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि रात्री ८...