Mumbai, एप्रिल 24 -- चिंता आणि तणाव प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे. तणावामुळेच लोक आजारी पडतात. अशा वेळी आनंदी राहणं गरजेचं आहे. आनंदी कसे रहावे हे बऱ्याच लोकांना माहित नसते. त्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता असते. ज्यामुळे ते तणावग्रस्त असतात आणि जीवनात यश मिळवू शकत नाहीत. अनावश्यक चिंतेतून बाहेर पडायचे असेल तर मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांचे काही उद्गार वाचा. ज्यामुळे तुम्हाला आतून आनंदी राहण्यास मदत होईल.

१) सुख म्हणजे सर्वकाही असणे नव्हे, तर आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घेणे होय. माणसाच्या इच्छा अनंत आहेत, त्या पूर्ण झाल्या नाहीत तर तो दु:खी होतो. पण सुखी व्हायचं असेल तर गौर गोपाल दास म्हणतात की, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घेऊन जगणं म्हणजे आनंद होय.

२) गौर गोपाल दास म्हणतात की आनंदी राहणे ही तुमची नि...