Mumbai, जून 5 -- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युतीचा भाजपच्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा हवाला देत महाराष्ट्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेसह पुणे, ठाण्यासह अन्य प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांनी तब्बल दोन दशकांच्या मतभेदानंतर किरकोळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून हातमिळवणी करण्याचे संकेत देत दोघांमध्ये संभाव्य सामंजस्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मनसेने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा देऊ केला होता,...