Jammu kashmir, फेब्रुवारी 11 -- Jammu and Kashmir News : जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. नियंत्रण रेषेजवळील अखनूर सेक्टरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात तीन जवान जखमी झाले होते. त्यापैकी दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. या हल्ल्यात एक कॅप्टन आणि एक जवान शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवरील फेंस पेट्रोलवर तैनात असताना हा हल्ला झाला. लष्कराने सांगितले की, या भागात शोधमोहीम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या खौर पोलीस ठाण्याअंतर्गत केरी बट्टल भागात दुपारी साडे तीनच्या सुमारास हा हल्ला झाला. नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या तीन जवान आयईडी स्फोटात जखमी झाले. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य एका जवानावर...