Kota, फेब्रुवारी 12 -- राजकुमार रावच्या चित्रपटातील एक गाणे आहे - ठुकरा के मेरा प्यार, मेरा इंतकाम देखेगी. या गाण्याचे बोल राजस्थानमधील पती-पत्नीशी मिळते-जुळते आहेत. राज्यातील कोटा जिल्ह्यात राहणाऱ्या मनीषने पत्नी सपना मीना हिच्यावर सरकारी नोकरी मिळाल्यानंतर धोका दिल्याचा आरोप केला आहे. पतीने म्हटले आहे की, त्याने सपनाच्या शिक्षणाला पाठिंबा दिला तिला आर्थिक मदत केली. आपली फसवणूक झाल्यानंतर त्याने पत्नीच्या वर्तवणुकीचा पर्दाफाश करत तिला नोकरीतून निलंबित करायला लावले आहे.

राजस्थानमधील एका महिला रेल्वे कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. तिच्या पतीने आरोप केला होता की, तिच्याजागी दुसऱ्याने परीक्षा दिली होती. अधिकाऱ्यांनी या आरोपाची चौकशी सुरू केली आहे. कोटा येथील सोगरिया रेल्वे स्टेशनवर पॉइंटमन म्हणून काम करणारी सपना मीना हिचे पती मनीष मीण...