Mumbai, मार्च 25 -- स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर कुणाल कामरा यांनी एक निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या निवेदनात त्यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार देत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याचबरोबर त्यांचे नंबर लीक करून धमकावणाऱ्यांना त्यांनी टोमणे मारले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे सांगितले तेच मी बोललो, असे कामरा म्हणाला.

कामरा यांनी आपल्या नव्या कॉमेडी शो 'नया भारत'मध्ये एका व्यंग्यात्मक गाण्याद्वारे शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. या गाण्यात त्यांनी २०२२ मध्ये झालेली शिवसेना ...