भारत, फेब्रुवारी 9 -- Budget Smartphones: बजेट स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. बाजारात असे काही स्मार्टफोन आहेत, ज्यांची किंमत १० हजारांपेक्षा कमी आहे आणि त्यामध्ये चांगला कॅमेरा देखील मिळतो. त्यामुळे ग्राहकांना आता कमी चांगले फीचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. अशा स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात.

रेडमी १४ सी 5G हा नुकताच लॉन्च झालेला बजेट स्मार्टफोन आहे, यात ६.८८ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ४ जेन २ ५ जी सारखा दमदार प्रोसेसरसह येतो. यात ४ जीबी रॅम मिळते. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तसेच ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटोरोला जी३५ 5G हा फोन असंख्य फीचर्सने सुसज्ज असलेला हा आणखी एक 5g स्मार्टफो...