New delhi, मार्च 20 -- ज्या वयात आपल्यापैकी बहुतेक जण नोकरी शोधण्यासाठी आणि चांगले करिअर करण्यासाठी धडपडत आहेत, त्या वयात या रशियन माणसाने निवृत्ती घेतली आहे. इतकंच नाही तर आता या २३ वर्षीय व्यक्तीला आयुष्यभरासाठी पेन्शनही मिळणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण रशियातील एका व्यक्तीची ही खरी कहाणी आहे. पॉवेल वयाच्या २१ व्या वर्षी नोकरीत रुजू झाले आणि अवघ्या दोन वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. यासोबतच इंटरनॅशनल रेकॉर्ड रजिस्ट्रेशन एजन्सीमध्येही त्याने एक अनोखा विक्रम केला आहे.

ही गोष्ट आहे पावेल स्टेपचेन्कोची. ऑडिट सेंट्रलच्या अहवालानुसार, पॉवेल वयाच्या २३ व्या वर्षी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयातून निवृत्त झाले. मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला ह...