भारत, फेब्रुवारी 1 -- छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोडका भागात सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमद्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत आतापर्यंत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सध्या सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे.

नक्षलविरोधी मोहिमेत जवान व नक्षलवाद्यांमध्ये सतत चकमकी होत आहेत. सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तोडका परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतररित होत आहेत किंवा...