Delhi, जानेवारी 30 -- Pinaka Rocket System : भारतीय बनावटीच्या पिनाका मल्टी लाँच आर्टिलरी रॉकेट सिस्टीम खरेदीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने (सीसीएस) दोन मोठ्या करारांना बुधवारी मंजुरी दिली. तब्बल १०,२०० कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी केला जाणार आहे. यात पिनाका रॉकेट प्रणालीचा समावेश आले. पिनाका रॉकेट यंत्रणेची मारक क्षमता वाढवण्यात आली असून ही यंत्रणा आता पूर्वीपेक्षा अधिक घातक झाली आहे.

पहिला करार हा ५,७०० कोटी रुपयांचा आहे. या कराराअंतर्गत हाय-एक्सप्लोसिव्ह प्री-फ्रैगमेंटेड रॉकेट एम्युनेशनचा समावेश आहे. तर दुसरा करार हा ४,५०० कोटी रुपयांचा आहे, ज्यात एरिया डिनायल अ‍ॅम्युनिशनचाही समावेश आहे. लष्करासाठी आवश्यक असलेल्या १० पिनाका रेजिमेंटसाठी हा करार करण्यात आला आहे.

या हाय-एक्सप्लोसिव्ह प्...