New delhi, मार्च 27 -- चीनमधील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. रिपोर्टनुसार, या डॉक्टरांनी जेनेटिकली मॉडिफाइड डुक्कराचे यकृत ब्रेन डेड व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित केले. या प्रक्रियेनंतर, हे यकृत सुमारे १० दिवस त्या व्यक्तीच्या शरीरात योग्यरित्या कार्य करत राहिले. डुक्करापासून माणसापर्यंत केलेली ही शस्त्रक्रिया अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया मानली जाते. असे प्रत्यारोपण यशस्वी झाल्यास मानवी इतिहासातील मोठी क्रांती ठरेल.

चीनमधील शियान येथील झिजिंग हॉस्पिटलमधील शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे डॉक्टर लिन वांग यांनी सांगितले की, डुक्कराचे यकृत मानवी शरीरात चांगले कार्य करू शकते की नाही आणि भविष्यात ते मूळ मानवी यकृताची जागा घेऊ शकते की नाही याचा आम्ही प्रथमच शोध घेतला आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून आम्ही मिळवलेले यश आमच्...