दिल्ली, फेब्रुवारी 2 -- Defence Budget 2025 : भारतासमोरील अंतर्गत आणि बाहिर्गत आव्हाने पाहता यंदाच्या अर्थसंकल्पत संरक्षण बजेटमध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी गेल्या बजेटच्या तुलनेत जवळपास १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्पांत संरक्षण क्षेत्रासाठी ६.८१ लाख कोटींची तरतूद केली. ही तरतूद गेल्यावेळीपेक्षा जास्त आहे. यंदा भारत सरकारने संरक्षण बजेटमध्ये ३६ हजार ९५९ कोटींची वाढ केली आहे.

संरक्षण बजेटमध्ये सुमारे ६० हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाला यावेळी ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात गेल्या वेळेच्या तुलनेत ९.५३ टक्के वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ जीडीपीच्या केवळ १.९१ टक्क्यांच्या जवळपास असल्याने ही वाढ कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चालू आर्थिक ...