Pune, फेब्रुवारी 11 -- पिंपरी-चिंचवड महापालिकेनं बेकायदा बांधकामांवर मोठी कारवाई करत चिखली कुदळवाडी परिसरातील हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामं भुईसपाट केली आहेत. नियोजित विकासकामे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरील अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकानं तसंच, अनधिकृत बांधकामं हटविण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून यापुढंही ती सुरूच राहणार आहे.

महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागानं विभागीय अतिक्रमण कृती दलासह सलग तीन दिवस ही कारवाई केली. शनिवार, रविवार आणि सोमवारी देखील ही कारवाई सुरू होती. या कारवाईत १ कोटी २० लाख ७२ हजार चौरस फुटांवरील एकूण १,५११ अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत.

राखीव जागेवर बांधलेले टीन शेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकानं आणि नियोजित रस्त्यांचे जाळे यासह अतिक्रमणे क...