Mumbai, एप्रिल 15 -- नाटककार रत्नाकर मतकरी यांचं 'अलबत्या गलबत्या' हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर या नाटकावरून चित्रपट करण्याचा मोठा निर्णय घेतला असून, हे शिवधनुष्य ते पेलणार आहेत. या चित्रपटात अभिनेते वैभव मांगले मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत. पुढीलवर्षी १ मे २०२५ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या टीझरनेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आता या चित्रपटासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत.

आता 'अलबत्या गलबत्या' नाटकाला रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य तरुण लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर पेलत आहे. वरूणनं आतापर्यंत चित्रपट, वेब सीरिज केल्या आहेत. त्यात 'मुरांबा', 'दो गुब्बारे', 'एक दोन तीन चार' या चित्र...