Pune, जानेवारी 31 -- MPSC Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना फोन कॉल गेले असून तुम्ही आम्हाला ४० लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला दोन दिवसाआधी पेपर देतो. त्यापूर्वी आपल्याला व्हॉटस्अप कॉलवर मीटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्या प्रमाणे पेपर मिळेल, असे आमिष विद्यार्थ्यांना दाखवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सत्य तपासण्याची मागणी केली आहे. तर आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुणे पोलिस आयुक्तांकडे याची तक्रार केली आहे.

राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी...