Delhi, जानेवारी 27 -- Starbucks Ceo Salary: जगात सध्या एका कंपनीच्या सीईओच्या पगाराची चर्चा सुरू आहे. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला चार महिन्याचा पगार ९६ दशलक्ष डॉलर (सुमारे ७९६.८ कोटी रुपये) पगार मिळाला आहे. अमेरिकेच्या कॉर्पोरेट जगतातील हा सर्वाधिक पगार समजला जात आहे. सीईओ ब्रायन निकोल असे या सीईओचे नाव असून ते स्टारबक्स कॉर्पचे मुख्यकार्यकारी अधिकारी आहे. २०२४ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, निकोल यांचं पॅकेज अ‍ॅपलचे टिम कुक आणि गुगलचे सुंदर पिचाई यांच्यापेक्षा जास्त आहे.

निकोलच्या पगारापैकी ९४ टक्के रक्कम ही स्टॉकमधून मिळाली आहे. स्टारबक्सने सप्टेंबर २०२४ मध्ये लक्ष्मण नरसिम्हन यांच्या जागी ब्रायन निकोल यांची कंपनीचे नवे अध्यक्ष आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये स्टारबक्सची धुरा हाती घेतल्यावर एका महि...