Kolkata, फेब्रुवारी 2 -- पत्नीने आर्थिक कारणासाठी पतीला किडनी विकण्यासाठी भाग पाडले. तिच्या शब्दाखातर नवऱ्यानं १० लाख रूपयांसाठी किडनी विकली खरी, पण किडनी विकून जे पैसे आले,ते पैसे घेऊनबायको प्रियकरासोबत पसार झाली आहे.मुलीच्या भविष्यासाठीपैसेबँकेतठेवत असल्याचं सांगत तिनेबॉयफ्रेंडसोबत पलायन केलं. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हावडा येथे घडलीआहे. हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ माजली आहे.

हावडा जिल्ह्यातील संकरैल येथील एका महिलेने पतीला १० लाख रुपयांना किडनी विकण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. पतीची किडनी विकून पैसे मिळाल्यावर ती महिला ते पैसे घेऊन प्रियकरासह पळून गेली.

मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी महिलेने पतीवर दबाव आणला होता. अनेक महिन्यांच्या नकारानंतर अखेर पतीने किडनी विकण्याची तयारी दर्शवली. त्य...