भारत, जानेवारी 24 -- सध्या विजेचं अव्वाच्या सव्वा बिल परवडत नसल्याने अनेक नागरिक सौर ऊर्जेचा पर्याय निवडत आहेत. त्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीएम-सूर्य घर वीज योजनेमुळे अनेकांना प्रोत्साहन मिळत आहे. मुंबईत बोरिवलीमध्ये राहणारे विकास पंडित यांनी पीएम-सूर्य घर वीज योजनेंतर्गत जून २०२४मध्ये त्यांच्या घरावर ३ किलोवॅट क्षमतेची रुफटॉप सोलर सिस्टिम बसवली होती. यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे वीज बील येत नाही. ग्रीन एनर्जीचा पर्याय स्विकारल्याबद्दल आता पंडित यांचा केंद्र सरकारने सन्मान केला आहे. येत्या २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या रिपब्लिक डे परेडमध्ये विशेष पाहुणे म्हणून सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारकडून पंडित यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पीएम-सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत घरावर रुफटॉप सोलर सिस्टिम बसवणाऱ्या...