Mumbai, जानेवारी 27 -- भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अदानी कुटुंबाने प्रयागराज येथील पवित्र महाकुंभात सहभागी होताना आपला धाकटा मुलगा जीत अदानी याच्या लग्नाची तारीख जाहीर केली. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्यासह त्यांची पत्नी प्रीती आणि मोठा मुलगा करण यावेळी उपस्थित होते.

जीतचे लग्न ७ फेब्रुवारीला असून ते साधे आणि पारंपारिक असेल, असे त्याने सांगितले. आमचे उपक्रम इतर सर्वसामान्य कुटुंबासारखेच आहेत.

जीत अदानी सध्या अदानी ग्रुपमध्ये ग्रुप फायनान्सचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत आणि आता त्यांचा साखरपुडा एका प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याची मुलगी दिवा जैमिन शाह सोबत झाला आहे.

जीत पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेसचे माजी विद्यार्थी आहेत.

स्ट्रॅटेजी, रिस्क मॅनेजमेंट आणि कॅपिटल मार्केटवर लक्ष...