Karnataka, फेब्रुवारी 4 -- CowSmuggling : देशातील अनेक राज्यात गो-तस्करीच्या घटना समोर येत आहेत. याविरोधात स्थानिक प्रशासन कडक कारवाई करते. मात्र गो तस्करी सुरुच असल्याचे दिसून येते. आता याविरोधात कर्नाटक सरकार एक्शन मोडवर आले आहे. उत्तर कन्नड़ जिल्ह्यातील गाय चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री मंकल एस वैद्य य़ांनी इशारा दिला की, अशा घटनांत सामील लोकांना रस्त्यात व भरचौकात गोळ्या घातल्या जातील.

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात गो वंश चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रभारी मंत्री मंकल वैद्य यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, गो तस्करीत गुंतलेल्या व्यक्तींना रस्त्यावर किंवा चौकांमध्ये उघडपणे गोळ्या घातल्या जातील. वैद्य यांनी जिल्ह्यात असे प्रकार सुरू राहू देणार नसल्याचे सांगितले. गाई व गोपालकांच्या हिताचे रक्...