Mumbai, मार्च 29 -- बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. नुकताच अभिनेत्याने शिवसेनेत प्रवेश केला. तर, आता तो यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही मैदानात उतरणार आहे. 'कला संस्कृतीसाठी काम करणार', असं यावेळी गोविंदाने म्हटलं आहे. मात्र, गोविंदाचे हे बोल ऐकून चित्रपट लेखक-निर्माते महेश टिळेकर त्याच्यावर चांगलेच वैतागले आहेत. एक पोस्ट लिहित महेश टिळेकर यांनी गोविंदाच्या जुन्या बेशिस्त वर्तनाचा पाढाच वाचून दाखवला आहे. महेश टिळेकर यांनी गोविंदाचे अनेक किस्से शेअर केले आहेत.

महेश टिळेकर यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, 'कला संस्कृतीसाठी काम करणार गोविंदा? खरं तरं त्याने पुन्हा राजकारणात येणं, एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करणं याला विरोध नाहीच. पण, राजकीय प्रवेश करताना जे कारण सांगितलं ...