भारत, मार्च 29 -- बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील दिग्गज कंपनी गोल्डमन सॅक्सने सरकारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवर सट्टा लावला आहे. शुक्रवारी गोल्डमन सॅक्सने खुल्या बाजारातून या दोन्ही कंपन्यांचे समभाग मिळून २८१ कोटी रुपयांना खरेदी केले.

बीएसईब्लॉक डीलच्या आकडेवारीनुसार, गोल्डमन सॅक्सशी संबंधित कंपनी गोल्डमन सॅक्स (सिंगापूर) ने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे 3.85 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. तर, एक्स्चेंज डेटानुसार, झोमॅटोचे 60.07 लाख शेअर्स गोल्डमन सॅक्सने खरेदी केले आहेत.

ब्लॉक डील १९९.५० ते ४,१७६.२५ रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करण्यात आली. ज्याची एकूण किंमत २८०.९६ कोटी रुपये आहे. हाँगकाँगची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी काडेन्सा कॅपिटलची कंपनी काडेन्सा कॅपिटल फंडने झोमॅटो आणि हिंदुस्थान एरोन...