भारत, फेब्रुवारी 28 -- गोदरेज उद्योग समूहाच्या सिक्युरिटी सोल्युशन्स विभागाने उच्च दर्जाचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित होम लॉकर्सची नवीन श्रेणी बाजारात सादर केली आहे. उत्तम सुरक्षेसह सुंदर रचना हे या नवीन लॉकर उत्पादनांचे एक वैशिष्ट्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

गोदरेज कंपनीद्वारे होम लॉकर्सच्या नव्याने लॉन्च केलेल्या रेंजमध्ये एनएक्स प्रो स्लाइड (NX Pro Slide), एनएक्स प्रो लक्स (NX Pro Luxe), रिनो रिगल (Rhino Regal) आणि एनएक्स सिल (NX Seal) या लॉकर्सचा समावेश आहे. ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेता या उत्पादनांमध्ये लॉकर उघडण्यासाठी डिजिटल आणि बायोमेट्रिक अशी दुहेरी प्रवेश यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय इंटेलिजेंट इबझ अलार्म यंत्रणा, भरपूर स्टोरेज आणि आधुनिक घराच्या सौंदर्यशास्त्राशी जुळणारे आकर्षक इंटिरियर हे वैशिष्ट्य...