भारत, मार्च 5 -- स्मार्टफोन कॅमेऱ्याचा विचार केला तर गुगल पिक्सल लाइनअपच्या स्पर्धेत दुसरा कोणताही फोन उभा राहत नाही. उत्तम फोटोग्राफीसाठी नवीन फोन खरेदी करायचा असेल तर गुगलचा प्रीमियम मोबाइल डिव्हाइस गुगल पिक्सल 9 प्रो 5जी वर जबरदस्त डिस्काउंटचा फायदा दिला जात आहे. यावर 10,000 रुपयांचा डायरेक्ट डिस्काउंट दिला जात असून इतर ऑफर्सही उपलब्ध आहेत.

गुगल पिक्सल 9 प्रो 5 जी हा कंपनीचा सर्वात प्रीमियम डिव्हाइस आहे आणि शक्तिशाली झूम सपोर्टसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म क्रोमावरून खास ऑफरसह स्वस्तात खरेदी करता येणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ४२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फ्लॅगशिप फोनमध्ये ४७०० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म क्रोमावर 109,999 रुपयांमध्ये ...