Solapur, जानेवारी 31 -- Ladki Bahin Yojana scam news : महायुतीला लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली. मात्र, या योजनेचे अनेक घोटाळे आता पुढे येऊ लागले आहेत. अनेकांनी बोगस लाभार्थी होत या योजनेचा फायदा घेतला आहे. धक्कादायक म्हणजे, गावात मुस्लिम महिला नसतांना त्यांच्या नावाने काही परराज्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थींच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या रॅकेटने लातूर, सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं खोटं दाखवून परराज्यात राहणाऱ्या महिलांना राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ करून दिला आहे. त्यांनी तब्बल १,१७१ अर्ज भरले असून हे सर्व या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. मात्र य...