रायपुर,छत्तीसगढ़, फेब्रुवारी 7 -- Raipur Accident : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये भारत सरकार असा बोर्ड असलेल्या एका इंडिगो कारने दिलेल्या धडकेत तीन तरुण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातानंतर मोठा गोंधळ उडाला होता. भरधाव वेगात असणाऱ्या कारने एका स्कुटीला धडक दिली. या स्कुटीवरुन प्रवास करणारे तीन तरुण या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मेकाहारा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या कारमध्ये एक रशियन तरुणी असल्याचा दावा करण्यात आला असून तिने अपघातानंतर पोलिसांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका रशियन महिलेने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर गोंधळ घातल्याचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा साथीदार आणि पोलिस तिला समजावण्याचा प्रयत्न करतांना व्ह...