New delhi, मार्च 20 -- गाझामधील जनतेला अखेरचा इशारा दिल्यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केले आहेत. हवाई हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने आता गाझावर जमीनी कारवाई सुरू केली आहे. इस्रायलच्या लष्कराने बुधवारी सांगितले की, त्यांनी गाझामध्ये लक्ष्यित जमिनीवरील कारवाई सुरू केली आहे आणि गाझाचा काही भाग पुन्हा ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच गाझावर हवाई हल्ले सुरू झाले होते. या हल्ल्यांमध्ये ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर हमाससोबतचा शस्त्रसंधी करारही संपुष्टात येण्याच्या मार्गावर होता.

इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) बुधवारी दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आणि उत्तर आणि दक्षिण गाझादरम्यान अंशतः बफर तयार करण्यासाठी सैनिकांनी मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीमध्ये जमीन...