भारत, नोव्हेंबर 25 -- सावत्र आईने तीन लहान मुलांना विष खायला घालून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. गर्भवती असलेल्या महिलेनं तिच्या सावत्र मुलांना जेवणातून विष खायला घातलं. जेवल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली. तिघांपैकी एकाचा यामध्ये मृत्यू झाला. ही घटना झारखंडमधील गिरिडाह इथल्या रोहनटांडमध्ये घडली.

रोहनटांड गावातील सुनील सोरेन यांची पहिली पत्नी शैलीन मरांडी यांचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी सर्पदंशाने झाला होता. त्यांना एक मुलगी आणि ४ मुले होती. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर सुनील सोरेन यांनी सुनीता हांसदा हिच्याशी लग्न केलं होतं. सुनीता आता गर्भवती असून लग्नानंतर सुनीलसोबत ती रोहनटांडमधील घरी राहते.

दुर्गापुजेआधी सुननीता हांसदा सर्व मुलांना आजी आजोबांकडे सोडून आपल्या पतीसोबत माहेरी गेली होती. तिथून सुनील कामासाठी बेंगळुरूला गेला. दरम्...