Mumbai, जानेवारी 26 -- गर्भधारणेनंतर महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रसूतीनंतर येणारे नैराश्य, गरोदरपणात गोष्टी विसरणे, यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. या समस्या अनेक महिलांना त्रासदायक ठरू शकतात. त्या समस्या नॉर्मल असल्या तरी लोकांमध्ये याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होते.

पण स्पेनमधील एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, गर्भधारणेमुळे महिलांच्या मेंदूच्या संरचनेवर परिणाम होतो आणि अनेक त्यात बदल दिसून येतात.

गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीदरम्यान महिलांमध्ये अनेक शारीरिक बदल दिसून होत असतात. पण हे बदल केवळ शारीरिक नसून त्यांचा संबंध मेंदूपर्यंतही विस्तारलेला असतो.

नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मेंदूमध्ये आढळणाऱ्या U-shaped ग्रे मॅटरचे प्रमाण गर्भधारणेच्या शेवटच्या दिवसांम...