New delhi, जानेवारी 27 -- काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मध्य प्रदेशातील महू येथे केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. प्रयागराजमधील महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर खर्गे यांनी गंगेत डुबकी मारल्याने दारिद्र्य दूर होते का, अन्न मिळते का, असा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस अध्यक्षांच्या या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाला आहे. भाजपने याला हिंदूंचा द्वेष म्हटले असून काँग्रेस पक्ष आता नवीन मुस्लीम लीग बनला असल्याची टीका केली आहे.

'जय बापू, जय भीम, जय संविधान'च्या घोषणा देण्यासाठी काँग्रेस पक्षाने सोमवारी मध्य प्रदेशात रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी खर्गे यांनी संविधान आणि बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मनुवादाचे अनुसरण केल्यास गरिबांचा नाश होईल, असे खर्गे म्हणाले. सर्वांनी एकत्र येऊन मनुवाद संपवा...