Pune, जानेवारी 29 -- Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळकरी मुलाने आपल्या वर्गमित्राला १०० रुपये देऊन विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील दौंडतालुक्यातील सेंट सेबॅस्टियन इंग्लिश स्कूलमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या शाळेतील ७ वी मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील मुलाने दुसर्‍या वर्गातील मुलाला तिच्यावर बलात्कार आणि खून करण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दिली. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पीडित विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांना माहिती दिली होती. एका विद्यार्थ्याने तिच्या पालकांची खोटी सही केली. याच...