संवाददाता,मुजफ्फरनगर, फेब्रुवारी 2 -- Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून तिला जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्या झालेल्या तरुणीच्या बहिणीच्या नवऱ्याला अटक केली आहे.

आरोपीने पत्नीच्या बहिणीला मारण्यासाठी बँकेतून लोन काढून तिची हत्या करण्यासाठी दोघांना ३० हजार रुपयांची सुपारी दिली. तिची हत्या करण्यापूर्वी आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसोबत तिच्यावर सामूहिक बलात्कारही केला. त्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी तिघांनी मिळून तरुणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. खून झालेली तरुणी ही बहिणीच्या नवऱ्याला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुजफ्फरनगर पोलिसांनी पत्रकार...