फरीदाबाद। हिन्दुस्तान, फेब्रुवारी 19 -- Son burnt alive father Faridabad : दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमधील अजय नगर २ मध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलाने खिशातील पैसे चोरल्यामुळे व अभ्यास करत नसल्याने वडील त्याच्यावर रागावले. मात्र, यामुळे संतापलेल्या मुलाने थेट वडिलांना झोपेत असतांना जाळून ठार मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुळचे उत्तर प्रदेशातील मिर्झापूरयेथील रहिवासी असलेले मोहम्मद अलीम (वय ५५) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तर त्यांच्या १४ वर्षांच्या मुलाने त्यांची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. अलिम हे मुलासह अजय नगर पार्ट-२ मध्ये भाड्याच्या घरात चार महिन्यांपासून राहत होते.

अलीम धार्मिक स्थळांसाठी देणग्या गोळा करून मच्छरदाणी व इतर वस्तूंची विक्री करायचा. सोमवारी रात्री अलीमने मुलाला अभ्यास न केल्यान...