भारत, मार्च 22 -- मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाचा फक्त वापर केला आहे. क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी टिका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा नागपूरस्थित पत्रकार प्रशांत कोरटकर अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यावर मनोज जरांगे पाटील यांनी टिकास्त्र सोडले. प्रशांत कोरटकर कसा सापडत नाही, तो काय सरकारचा सोयरा आहे काय, असं जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ' प्रशांत कोरटकर सरकारचा सोयरा आहे ना. त्यामुळे तो पोलिसांना सापडणार नाही. बाकीचे असते तर कशात तरी आतमध्ये टाकले असते. प्रशांत कोरटकरवर सरकार...