मुरादाबाद, मार्च 6 -- Moradabad gang rap : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये क्रूरतेची परिसीमा आरोपींनी ओलांडली. भगतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे कारमधून चार तरुणांनी अपहरण केले होते. आरोपीने पीडितेला घरात बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी मुलीला जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले. एवढेच नाही तर पीडित मुलीवर अॅसिड ओतून तिच्या हातावरील ओमचा टॅटू पुसण्यात आला. पीडितेच्या मावशीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.

भगतपूर पोलिस ठाण्याच्या एका गावात राहणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २ जानेवारी रोजी तिची १४ वर्षीय अल्पवयीन भाची कपडे शिवण्यासाठी मार्केट रोडमार्गे टेलरच्या दुकानात जात होती. त्यांच्या गावातील चार तरुण बाजार...